Ad will apear here
Next
वैराटगडावर स्वच्छता मोहीम
वैराटगडावर दुर्गसंवर्धन मोहिम राबविण्यात आली
गडचिरोली : सह्याद्री प्रतिष्ठानच्या चंद्रपूर विभागाच्या वतीने १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील किल्ले वैराटगडावर दुर्गसंवर्धन  मोहीम राबविण्यात आली. गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.

सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप रिंगणे यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली. ‘किल्ले वैराटगड एकूण १४ एकरमध्ये पसरलेला आहे. या किल्ल्याला तीन दरवाजे आहेत. त्यातील मुख्य दरवाजा चांगल्या स्थितीत आहे; पण त्याची दोन दारे ढासळली आहेत. काही काळात ती नामशेष होण्याची शक्यता आहे. या किल्ल्यावर पाच विहिरी असून, फक्त एकाच विहिरीत पाणी आहे. गडावरील राजमाहालाची अवस्था फार वाईट आहे. किल्ल्यातील परिकोट बुरुज हा पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत असून, फक्त काही चिरे शिल्लक उरले आहेत. त्या परिकोटाची सीमा १३० ते १४० मीटर एवढी आहे. किल्ल्यावर असलेल्या शिवमंदिराजवळ खाजरीच्या झाडांचे रान मोठ्या प्रमाणात पसरले आहे. किल्ल्यावरील भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार मातीने व झाडाझुडपांनी पूर्णपणे बंद झाले आहे. हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत असून, या किल्ल्याच्या परिस्थितीचा आढावा सह्याद्री प्रतिष्ठानच्या चंद्रपूर विभागाने घेतला. प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन विभागामार्फत पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करून किल्ल्याच्या तात्काळ डागडुजीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत,’ अशी माहिती रिंगणे यांनी दिली.

रिंगणे यांनीच या मोहिमेचे नेतृत्व केले. चंद्रपूर व गडचिरोली येथील ४० ते ५६ वयोगटातील सदस्यांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. शशिकांत देशकर, निमेश मानकर, संजय तुरले, लीलाधार भोयर, गणेश गिरीधर आदींचाही त्यात समावेश होता.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZKKBC
Similar Posts
‘खेळाडूंनी स्वत:च्या गुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करावे’ गडचिरोली : आदिवासी विकास विभागांतर्गत दर वर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागील शासनाचा मुख्य हेतू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक काटकपणा, धैर्य, चिकाटी हे क्रीडापूरक गुण उपजतच असतात. मागील वर्षी आपल्या जिल्ह्यात विभागीय क्रीडा संमेलन झाले
बोलू ‘बोली’चे बोल! - झाडी बोली, गोंडी बोली (व्हिडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
वैराटगडावर दुर्गसंवर्धन मोहीम गडचिरोली : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री प्रतिष्ठानचा चंद्रपूर विभाग गडचिरोलीतील किल्ले वैराटगड (ता. आरमोरी) येथे दुर्गसंवर्धन मोहीम राबवणार आहे. रविवारी, १४ मे रोजी होणाऱ्या या मोहिमेत दुर्गप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप वासुदेव रिंगणे यांनी केले आहे
नागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी ‘करू या देशाटन’च्या गेल्या काही भागांत आपण विदर्भसौंदर्य पाहत आहोत. आजच्या भागात फेरफटका मारू या नागभीड अभयारण्य, माणिकगड, पवनी आणि आसपासच्या काही पर्यटनस्थळांवर...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language